Amalner

?️अमळनेर कट्टा..आज तालुक्यात तुरळक पाऊस..पण तालुक्यात दुबार पेरणीचे संकट..!बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा..!

?️अमळनेर कट्टा..आज तालुक्यात तुरळक पाऊस..पण तालुक्यात दुबार पेरणीचे संकट..!बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा..!

अमळनेर तालुक्यात पावसाने दडी मारली बळी राजाला आता पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस गायब झाला आहे. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ते शेतकरी संकटात सापडले आहेत.दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहेत.गेल्या महिन्यात तालुक्यात 41.40 MM पावसाची नोंद झाली आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.

सुरुवातीला राज्या बरोबरच अमळनेर तालुक्यात पावसाला चांगली सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा निर्माण होऊन पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण नंतर पावसाने जी दडी मारली आहे. ती आजतागायत … सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. मात्र, मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

तालुक्यात सध्या २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या असून आता बळी राजाला पावसाची प्रतीक्षा आहे.की जेणे करून दुबार पेरणी करावी लागणार नाही. जुलै महीना सुरू झाला असून पहिला आठवडा देखील सरणार आहे आणि तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळे काही पेरण्या देखील खोळंबल्या आहेत.

पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नाही परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. जून महिन्यात ३०% पेरण्या झाल्या आहेत. पूर्व हंगामी कापसाची लागवड असून काही शेतकऱ्यांनी मका, उडीद, मूग व सोयाबीन लागवड देखील सुरू केली होती. आता पाऊस नसल्याने सोयाबीन, मूग व उडीद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

पिके करपण्याच्या मार्गावर

येत्या काही दिवसात उडीद देखील जळून जाईल की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागानं राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविली आहेत. या अंदाजानुसार महाराष्ट्रात 7 आणि 8 जुलै रोजी पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.

अमळनेर तालुक्यात 50% पाऊस कमी झाला असून जिल्ह्यात 28 % पेरण्या अद्यापि रखडल्या आहेत. दररोज दुपारपर्यंत उन्हाचा तडका देत आकाशात जमणारे ढग सायंकाळी हुलकावणी देत आहे.72% पेरण्या वाया जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमळनेर तालुक्यात जूनअखेरपर्यंत 50 टक्के पाऊस कमी असल्याने काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. तर अनेक तालुक्यात पेरण्या आटोपून पिकांचा अंकूर वर आले आहेत. मात्र पाऊस नसल्याने पिके सुकत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.आज जरी थोडा फार पाऊस झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने अजून तरी शेतकऱ्यांची चिंता कमी झालेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button