ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलेक्च्युल ह्या संस्थेच्या प्रदेश अध्यक्ष पदी महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांची फेरनिवड.
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : नवी दिल्ली येथे नुकतीच ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलेक्च्युल ह्या जागतिक संघटनेची बैठक इंडिया इंटरनॅशनल सेंटर मॅक्सम्युलर रोड लोधी गार्डन नवी दिल्ली येथे आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली…ह्या बैठकीस भारतातील प्रत्येक राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारताचे पूर्व निवडणूक आयुक्त डॉ जे व्ही जी कृष्णमूर्ती यांच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाचे (भारत सरकार) जेष्ठ विधिद्य ऍड प्रकाश निधी शर्मा संस्थेचे (आंतरराष्ट्रीय जनरल सेक्रेटरी) यांनी महाराष्ट्ररत्न नाशिक चे भूमीपुत्र अनिलभाई गांगुर्डे यांच कार्य बघता पुन्हा त्यांची प्रदेश अध्यक्ष पदी फेरनिवड केली..ही फेरनिवड ५ वर्षकरिता आहे.
सदर प्रसंगी..भारतातील अग्रगण्य पुरस्कारापैकी एक असलेला पुरस्कार जाहीर “पद्मविभूषण” ने सन्मानित असलेल्या डॉ.उमा शर्मा ,ED(प्रवर्त निदेशालय-ईडी) चे जनरल सेक्रेटरी श्री. आदिनारायन जी, कथक डांसर श्रीमती अनुश्री जी,श्रीमती सीए श्वेता पाठक, बार काउंसिल दिल्ली श्री.के.सी मित्तल आदी महानूभाव उपस्थित होते.






