India

?️ सीमा प्रश्न …भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार

?️ सीमोल्लंघन..भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार

जम्मू : पाकिस्नाने गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झाले असून, 3 सैनिक जखमी झाले आहेत. काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सीमेवर ही चकमक झाल्याची माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली. यावर्षी आतापर्यंत तब्बल 3200 हून अधिक वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये आतापर्यंत 30 नागरिकांचा मृत्यू झाला असून, शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरूवारी 10 डिसेंबरच्या रात्री देखील पाकिस्तानी सैन्याने पुंछ भागातील मानकोट सेक्टरमध्ये अचानक गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत भारतीय सैन्याला चिथवण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यामध्ये नागरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कृत्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झाले असून, त्यांचे काही बंकरही उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 2 तास ही चकमक सुरू होती. यामध्ये भारताचा एकही जवान जखमी झाला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button