अमळनेर
येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची अमळनेर येथिल मंगळग्रह मंदिर येथे भेट घेऊन “पाडळसरे धरणाचे कामासाठी निधी उपलब्ध करून युद्ध पातळीवर पूर्ण करा!”अशी मागणी निवेदन देत केली.खा.संजय राऊत यांचेशी पाडळसरे धरणाबाबच्या कामाच्या सद्यस्थिती व अपेक्षित निधींबाबत चर्चाही केली.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अमळनेर दौऱ्यात मंगळ मंदिर संस्थान येथे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांना धरण प्रश्नांबाबत कल्पना दिली. निवेदन देतांना जळगांव, धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जनतेसाठी धरण युद्धपातळीवर पूर्ण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे म्हणून युतीच्या शासन काळात सुरू झालेले धरण युद्ध पातळीवरील याच शासनकाळात निधी देऊन पूर्ण करा ! असे आवाहन याप्रसंगी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी मा.नगराध्यक्ष सुभाष चौधरी, मा.कुलगुरू प्रा.शिवाजीराव पाटील, हिरामण कंखरे,सुनिल पाटील,अजयसिंग पाटील,रणजित शिंदे,रविंद्र पाटील,एस.एम.पाटिल,प्रशांत भदाणे, योगेश पाटील,महेश पाटिल, सौ.वसुंधरा लांडगे ,आदिंनी केले.तर यावेळी ना. एकनाथ शिंदे,ना.गुलाबराव पाटिल, आ.शिरीष चौधरी, प्रा.डॉ.रविंद्र चौधरी आदिंसह शिवसेना नेते ,पदाधिकारी उपस्थित होते. धरण जनआंदोलन समितीचे हेमंत भांडारकर,श्रावण पाटील,सुरेश सोनवणे,सरपंच अशोक पाटील,गिरीश पाटिल आदिंसह पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.







