मुंबईत NCB अधिकाऱ्यांवर ड्रग माफियांचा हल्ला..5 अधिकारी जखमी..!एक अधिकारी गंभीर..आरोपी अटकेत…
मुंबई मानखुर्द येथे एनसीबीच्या ( Narcotics Control Bureau) पथकावर ड्रग्ज माफियांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एनसीबीचे पाच अधिकारी जखमी झाले असून एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलं असून पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.हल्ल्यात एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी नायजेरियन असून इतर आरोपी फरार झाले आहेत.
मानखुर्द आणि वाशी स्टेशन दरम्यान रेल्वे रुळालगत खाडी परिसरात नायजेरियन नागरिकांचा अंमली पदार्थांचा धंदा सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर तस्करी करणाऱ्यांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पथकासह छापा घातला. मात्र ड्रग्ज पेडलर्सनी या पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एनसीबीचे पाच अधिकारी जखमी झाले.
या कार्यवाहीत एक कोटी रुपयाचं कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आलं आहे. कारवाईदरम्यान काही आरोपी फरार झाले तर मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. गेल्या आठवडाभरात एनसीबी पथकावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. ही बाब चिंताजनक आहे.






