नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा… अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारच..
न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरुणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरती ही सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारची असणार आहेत.
सुनिल घुमरे
नाशिक : मराठा आरक्षणा संदर्भात रविवारी दिनांक १३ रोजी वरद लक्ष्मी लॉन्स औरंगाबाद रोड पंचवटी येथे १२ वाजता नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा बैठक पार पडली.
आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा निकाल झाल्यानंतर मराठा बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या व पुढील दिशा ठरवण्याची भूमिका नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या या बैठकीत घेण्यात आलेल्या आहेत. त्याच वेळी राज्य शासनासह केंद्र सरकारचा ही निषेध नोंदविण्यात आला असून अन्याय झाला तर संघर्ष हा राज्य व केंद्र सरकार विरोधात उभा करणार शांत असलेले मोर्चे हे आक्रमक होण्याची वाट सरकारने बघू नये . त्वरीत निर्णय न घेतल्यास राज्य व केंद्र सरकारच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही असा सज्जड इशाराही मराठा समन्वयक करण गायकर यांनी या बैठकीद्वारे दिला आहेत.
९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहेत राज्य शासनासह केंद्र सरकार जबाबदार असून मराठा समाज बांधवांकडून या दोघांचाही निषेध नोंदवला गेला आहेत त्याच पार्श्वभूमीवर विचारविनिमय करत पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज बांधवांची ही तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये सुनील बागुल आमदार देवयानी फरांदे राजू देसले माजी आमदार नितीन भोसले अद्वय हिरे गणेश कदम शरद तुंगार माधवी पाटील मयुरी पिंगळे संदीप शितोळे निलेश मोरे बंटी भागवत चेतन शेलार, संजय सोमासे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
तसेच काही मंत्री यांनी न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच आरक्षण विरोधी निर्णय घेतल्याने अशा मराठा विरोधी नेत्याच्या निषेध सर्वानुमते नाशिकच्या बैठकीत करण्यात आला विधी विभागाचे आशुतोष कुंभकोणी मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात असमर्थ ठरल्याने त्यांच्याविषयी हलगर्जीपणा बाबत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून दूर करावे ही देखील मागणी केली. त्याचबरोबर सरकारने मराठा आरक्षणा व्यतिरिक्त इतर ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सारथी शिक्षण संस्था त्वरित सुरू करावी अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवून त्याला 500 कोटी निधीची तरतूद करावी चालू शैक्षणिक वर्षात मधील सर्व विद्यार्थ्यांची 50% फी राज्य सरकारने भरावी त्याचबरोबर नोकरीमध्ये ज्या तरुणांची आरक्षणाच्या धर्तीवर निवड व भरती झालेली आहे ही भरती विशेष भरती म्हणून सरकारने तिला मंजुरी द्यावी आधी विषय व ठराव या बैठकीत सर्व समाजाच्या वतीने मांडण्यात आले याला सर्वांनी एक मताने संमती दिली
उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे निवेदन दिल्यानंतर त्या आमदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तसेच आपल्या स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षाला वरील मागण्यांच्या संदर्भामध्ये खुले पत्र लिहावे आमदार-खासदार हे पत्र लिहिणार नाहीत त्यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रमक असे आंदोलन करून त्यांना मतदारसंघात फिरू दिले जाणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे
तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आल्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि काही ओबीसींच्या नेत्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला अशी राज्यभर चर्चा होती यासंदर्भात छगन भुजबळ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे आणि समीर भुजबळ यांना प्रत्यक्ष भेटून तुषार जगताप यांनी शहानिशा केली त्यानंतर असा कुठलाही पेढे वाटण्याचा कार्यक्रम झालेला नाही हे निष्पन्न झालं म्हणून कोणाच्या विरोधातले राज्यभर होणारे आंदोलन होणार नसल्याचेही तुषार जगताप यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री व मराठा समस्यांबाबत उपसमितीच्या संयुक्त बैठकीवर मराठा समन्वयक बहिष्कार टाकणार आहेत. मराठा समाजाचे सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात हे ठराव या बैठकीत करण्यात आले.
या प्रसंगी गणेश कदम यांनी आरक्षण स्थगिती विरोधात महाराष्ट्र भर आंदोलन झाल्यास याला राज्य व केंद्र सरकार राहील असे मत व्यक्त केले.
राजू देसले यांनी राज्य सरकारने राज्याच्या वतीने सारथी, वसतिगृह, ताराधुत, अण्णासाहेब महामंडळ प्रश्नी त्वरीत निर्णय घ्यावेत विद्यार्थी फी महाराष्ट्र शासनाने भरावी असे प्रतिपादन केले.
या बैठकीत आशिष हिरे, शिवाजी मोरे संतोष माळोदे, ज्ञानेश्वर थोरात, शरद तुंगार, संदीप शितोळे, किरण पणकार, नीलेश शेलार, चेतन शेलार, सचिन पवार,प्रशांत औट, सागर पवार आकाश जगताप, राजेश मोरे,सचिन शिंदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, मयुरी पिंगळे, पुनम पाटील तुषार भोसले,हेमंत मोरे, विलास जाधव, निलेश मोरे, शैलेश सूर्यवंशी, उमेश शिंदे, सुनिल खर्जुल अशी महिला, योगेश गांगुर्डे, दत्तू तुपे योगेश कापसे, सोमनाथ जाधव, नवनाथ कोठुळे, उत्तम गायकर, बाळा निगळ, मधुकर कासार, नितीन दातीर किरण बोरसे उज्वला देशमुख, संजय दाते, सागर शेजवळ, जितू उगले, पुंडलिक बोडके, सचिन कोकणे, करण शिंदे शुभम देशमुख प्रथमेश पिंगळे सुभाष गायकर सुदर्शन निमसे किशोर तिडके सागर आहेर गणेश पाटील भूषण तनपुरे अनिकेत पवार विजय उगले प्रसाद जाधव, आदित्य पाटिल समाज बांधव उपस्थितीहोते
सोशल डिस्टंसिंग चे काटेकोर पालन…
करण्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने आयोजित या बैठकीत उपस्थित मराठा समाज बांधवांनी सोशल डिस्टंसिंग सह प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले भविष्यात ऑनलाइन मीटिंग द्वारे व्यापक प्रमाणावर समाज बांधवांचीव चर्चा करण्याबाबत नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा विचार सुरू आहे.






