वणी नाशिक रस्त्यावर वनविभागाच्या विश्राम समोर ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागुन धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
विजय कानडे
वणी नाशिक रस्त्यावर वनविभागाच्या विश्राम समोर ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागुन धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे तसेच त्याच्या सोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाले आहेत.
घडलेला प्रकार असा की म्हैस खडक ता सुरगाणा येथील चिंतामण सावळीराम गायकवाड व राधा वाघमारे हे आपल्या गावा कडुन नाशिकला जात असताना वणी नाशिक रस्त्यावर सकाळी साडे दहा अकरा च्या दरम्यान वन विभागाच्या विश्राम गृहा समोर वणी कडुन विटांने भरलेला ट्रॅक्टर हा कृष्णगांव च्या दिशेने जात असतांना नाशिकच्या दिशेने जाणारी दुचाकी नं एम एच 15 एफ सी 4259 गाडीला पाठीमागुन जबरदस्त धडक दिल्याने दुचाकी वरील चिंतामण सावळीराम गायकवाड वय 25 रा.म्हैस खडक (उंबरठाण)ता.सुरगाणा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले धडक ऐवढी जोरात होती की दुचाकीस्वाराचा मेंदुच् बाहेर पडला त्यांच्या सोबत असलेल्या राधा वाघमारे ही 19वर्षाची तरुणी ही गंभीर जखमी झाल्याने.वणी ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले सकाळी साडे दहा अकरा च्या दरम्यान हा अपघात झाला ट्रॅक्टर मधे विटा भरून वरखेडा कडे जात होता ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रन सुटल्याने समोर चाललेल्या दुचाकी पाठी मागुन जोरात धडक दिल्याने मोठा आवाज झाला धडक झाल्याने वीटांनी ट्रॅक्टर भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला याचा चालक ही जखमी झाला आहे अपघात झाल्या नंतर आजुबाजुच्या जमलेल्या लोकांनी जखमीनां खाजगी वाहनांने वणी ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले ट्रॅक्टर चालक जगन भीमराव कडाळे वय 22 रा वरखेडा यास किरकोळ दुखापत झाली असुन त्याच्यावर उपचार करुन सोडून दिले तसेच दुचाकीवरील तरूणी हीला गंभीर मार लागल्याने तीच्या वर उपचार केले गंभीर असल्याने तीला नाशिकला हलविण्यात आले वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.






