Ahamdanagar

?Crime Diary… अमळनेर चा रहिवासी साडी नेसून घरफोड्या करणारा पोलिसांच्या जाळ्यात..!

?Crime Diary… अमळनेर चा रहिवासी साडी नेसून घरफोड्या करणारा पोलिसांच्या जाळ्यात..!

अहमदनगर वेषांतर करून साडी नेसून चो-या, घरफोड्या करणारा अमळनेर येथील रहिवासी संजय पाटील पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. कोपरगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.संजय अर्जुन पाटील वय 40 शिरुड नाका, शिवाजीनगर, अमळनेर जिल्हा जळगाव असे कोपरगाव पोलिसांच्या ताब्यातील चोरट्याचे नाव आहे.

त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यारे ,घरफोडीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे. संजय पाटील याने राहता जिल्हा अहमदनगर येथील दुकानात चोरी केल्याचे पोलिस तपासात कबुल केले आहे. 1 मार्चच्या रात्री त्याने कोपरगाव येथील येवला रस्त्यावरील चंद्रहास पैठणी, कोपरगाव साडी सेंटर, यामाहा बाइक तसेच समर्थ इलेक्ट्रिकल या चार दुकानांमधे चोरी केली होती. या चोरीत त्याने एकुण 52 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती. मनोज लक्ष्मीनारायण जोशी यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नागरे यांच्यासह कर्मचारी दिलीप तिकोणे, सचिन शेवाळे, राजू पुंड, सूरज अग्रवाल, राम खारतोडे यांनी याप्रकरणी कारवाईत सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button