Nandurbar

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त नंदुरबार जिल्ह्यात जनजागृती मोहिम

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त नंदुरबार जिल्ह्यात जनजागृती मोहिम

नंदुरबार/फहिम शेख

• 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 15 दिवस जनजागृती मोहिम राबवावी असे नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांना कळविले होते. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 01/07/2022 ते दिनांक 15/07/2022 रोजी दरम्यान नंदूरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी जनजागृती म्हणून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, भाषण स्पर्धा, पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.. त्याचप्रमाणे तरूण वयोगटातील विद्यार्थी व पालक यांचे एकत्रित चर्चासत्र / संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्याचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून आज दिनांक 15/07/2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त आयोजीत पंधरवाड्याची सांगता म्हणून नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे पथनाट्य व सामूहिक शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. श्रीमती मनिषा खत्री, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे व नंदुरबार जिल्ह्याचे शल्य चिकीत्सक श्री. चारुदत्त शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक श्री. आत्माराम प्रधान, नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. मच्छींद्र कदम, नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे श्री. रवि गोसावी युवारंग फाऊंडेशनचे श्री. जितेंद्र लुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर, नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्री. उमेश शिंदे यांचेसह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.यानिमीत्ताने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात युवारंग फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्तीबाबत पथनाट्य सादर केले. सदर पथनाट्यातून व्यसनामुळे व्यक्तीचा आर्थिक न्हास कसा होतो, तसेच व्यक्तीची समाजातील पत कमी होत असल्यामुळे व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. तसेच त्यानंतर शहादा येथील व्यसनमुक्त नागरीक श्री. संदीप पाटील यांनी शाळकरी वयात त्यांना लागलेल्या गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर होऊन स्वतःला भोगाव्या लागलेल्या त्रासाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मार्गदर्शन कल.सदर मार्गदर्शनपर भाषणात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम व आजार तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे बाढत चाललेली गुन्हेगारी यांच्यातील संबंध सांगून आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यसनामुळे मानवीय जीवनाच्या आरोग्यावर होणान्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली. पोलीस मुख्यालय. नंदुरबार येथील पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताचे वादन करुन कार्यक्रमाची सांगता केली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीला नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. रॅलीचे मार्गक्रमण अंधारे चौक, जुनी नगरपालिका या मार्गाने होवून नेहरू पुतळा येथे सदर रॅलीचे समापण झाले. सदर रॅलीला नंदुरबार शहरातील डी.आर. हायस्कुल, श्रॉफ विद्यालय, पी. के. अण्णा पाटील विद्यालय, एकलव्य विद्यालय, यशवंत विद्यालय, मिशन विद्यालय, जी.टी.पी. महाविद्यालय जिजामाता विद्यालय, भामरे कोचिंग क्लासेस मधील जवळपास 1200 ते 1300 विद्यार्थी उपस्थित होते. सदरची रॅली चालू असतांना आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून रॅलीचे मनोबल वाढवत होते.आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्यानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवर “नको अंमली पदार्थाची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा ” तसेच ” जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा “, ” नशे से दोस्ती जीवन से मुक्ती, नशे को ” दूर भगाना है खुशहाली को हमें लाना है”, “न काम का, न काज का, नशा हे दुश्मन जान का’ अशा विविध पोस्ट तयार करुन प्रसारीत करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अशाच आशयाचे बॅनर जिल्हयात विविध ठिकाणी लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत महत्वाच्या किंवा वर्दळीच्या ठिकाणी वृध्द्, तरुण यांच्या कॉर्नर बैठका घेऊन अंमली पदार्थाचे सेवन करु नये व अंमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button