Bollywood

Bollywood: ट्रॅजेडी क्वीन ची स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला… ही अभिनेत्री साकारणार भूमिका..

Bollywood: ट्रॅजेडी क्वीन ची स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला… ही अभिनेत्री साकारणार भूमिका..

ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. भारतीय सिनेसृष्टीला एका पेक्षा एक दर्जेदार सिनेमे मीना कुमारी यांनी दिले आहेत. भारतासह विदेशातही अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील मीना कुमारी यांचं योगदान मोलाचं आहे. बालपणीच त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. ‘पिया घर आजा’,’श्री गणेश महिमा’,’परिणीता’ आणि ‘बैजू बावरा’ अशा सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून मीना कुमारी घराघरांत पोहोचल्या आहेत. सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे मीना कुमारी अनेकदा चर्चेत आल्या आहेत.

मीना कुमारी यांच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) सांभाळणार आहे. मनीष या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर ‘ट्रेजेडी क्वीन’च्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) झळकणार आहे. मीना कुमारी यांच्या बायोपिकचं नाव काय असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. सध्या या सिनेमाच्या संहितेवर काम सुरू असून लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे. टी-सीरिजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) नुकतीच ओम राऊत (OM Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमात झळकली होती. या सिनेमात कृती सीता मातेच्या भूमिकेत दिसली होती. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. या सिनेमातील काही गोष्टींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

कृतीचा ‘गणपत’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. विकास बहल दिग्दर्शित हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होईल. तसेच ‘द क्रू’ या सिनेमातही कृती दिसणार आहे. आता मीना कुमारी यांच्या भूमिकेत कृतीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मीना कुमारी यांचं फिल्मी आयुष्य…

मीना कुमारी यांचं आयुष्य खूपच फिल्मी आहे. आता ते रुपेरी पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मीना कुमारी यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पैसे नसल्यामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केलं. पण पती त्रास देत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम मीना कुमारी यांच्या मनावर झाला. विदेशात जाऊन त्यांनी उपचार केले. पण उपचारादरम्यान 31 मार्च 1972 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button