Maharashtra

पर्यावरण मित्र संघटनाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ कविता हेमंत वाणी

पर्यावरण मित्र संघटनाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ कविता हेमंत वाणी

पर्यावरण मित्र संघटनाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ कविता हेमंत वाणी

 
चोपडा प्रतिनिधी-सचिन जयस्वाल
 येथील माळी वाड्यात राहणाऱ्या कृषीकन्या सौ कविता हेमंत वाणी यांची नुकतीच पर्यावरण मित्र संघटनाच्या जिल्हाध्यक्षा पदी 
.देवा तांबे सर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.वर्षा ताई भांडारकर आणि राष्ट्रीय सचिव जनार्दन सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .
        सविस्तर असे की,  सौ.कविता हेमंत वाणी यांनी आपल्या विभागात केलेल्या पर्यावरण कार्याची दखल घेऊन पर्यावरण मित्र संघटना (भारत ), या संस्थेच्या नियुक्ती समितीच्या अंतर्गत जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा पदावर सौ वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल व पुढील पर्यावरण कार्यास संस्थेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.
 संपूर्ण भारत देशाला हरित करण्यासाठी तसेच प्रदूषण ,रोगराई, दुष्काळ,पाणी टंचाई यामुळे होणाऱ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या यातून मुक्त करण्यासाठी निघालेली पर्यावरण मित्रांची वारी म्हणजे पर्यावरण मित्र संघटना(भारत ), ही संस्था आहे.
      पर्यावरण मित्र संघटना, ही संस्था आळंदी देवाची यां जगाची आई ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावन दर्शनाने पर्यावरण संरक्षण कार्यास सुरुवात करून संपूर्ण भारत देशांत पर्यावरण संरक्षणाचा प्रामाणिक संदेश देत आपल्या ध्येय प्राप्ती कडे  वाटचाल करत आहे.त्याच प्रमाणे ही संस्था प्रामाणिक पर्यावरण कार्य करून संपूर्ण भारत देश हरित करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करीत आहे हें पर्यावरण कार्य योग्य दिशेने वाटचाल करावे व ध्येय सिद्धी प्राप्त व्हावी यां अनुषंगाने संस्थेचे महाराष्ट्र राज्य तसेच भारतातील विविध राज्य,जिल्हे व तालुके पदावर संस्थांच्या नियुक्ती विभागाच्या अंतर्गत व वरीष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली,जबाबदार व पर्यावरण कार्यात विशेष योगदान असलेल्या कुशल पदाधिकारीची त्यांच्या इच्छुक विभागात नियुक्ती केली जात आहे. या निवडीबद्दल कृषिकन्या सौ कविता हेमंत वाणी यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , चन्द्रहांसभाई गुजराथी यांचा सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button