Bollywood: आणि प्रसिध्द अभिनेत्री रेखा यांचा अमिताभ यांच्या नातीबरोबर…!
अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं नातं माहिती नाही असं कुणीच नाही. या दोघांच्या प्रेमाची चर्चा आजही होत असते. यांची स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित लव्हस्टोरीपैकी एक आहे. बच्चन कुटुंब रेखा यांच्यापासून नेहमीच दूर राहतं हे आपण अनेक कार्यक्रमांमध्ये पाहिलं आहे.
मात्र अमिताभ आणि जया यांची सून ऐश्वर्या रेखांवर नेहमीच प्रेम व्यक्त करताना दिसून आली आहे.नुकतंच ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उदघाटन कार्यक्रमात रेखा सहभागी झाल्या होत्या. दरम्यान ऐश्वर्यासुद्धा आपली लेक आराध्यासोबत आली होती.
जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील सिनेतारकांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चांद लागले. या सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंबानींच्या या सोहळ्याला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती. याबरोबरच ऐश्वर्या राय बच्चन लेक आराध्यासह उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नातीबरोबर फोटोसाठी पोझही दिल्या. रेखा यांचे आराध्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
या फोटोंमधील रेखा व आराध्या यांच्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “रेखा त्यांच्या नातीबरोबर” अशी कमेंट एकाने केली आहे.






