Nashik

नविन नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नगरसेवक तिदमे यांच्याकडून शिवछत्र अर्पण

नविन नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नगरसेवक तिदमे यांच्याकडून शिवछत्र अर्पण

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नवीन नाशिक सिडको शिवसेना नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे आणि राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे शिवजयंती निमित्त जुने सिडकोतील शॉपिंग सेंटर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ५१ हजार रुपयांचे शिवछत्र अर्पण करण्यात येणार आहे
जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट येथे सर्वात जुना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्याचे विविध संस्था आणि व्यक्तींकडून नियमित पूजन होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे ऊन, वारा, पाऊस यांपासून रक्षण व्हावे
यासाठी प्रभाग क्र २४
मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण ( बंटी) तिदमे आणि राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे शिवछत्र अर्पण करण्यात येणार आहे. आकर्षक नक्षीकाम आणि प्राचीनरूप दिलेल्या शिवछत्रासाठी विशिष्ट साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. शिवजयंती निमित्त शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हे शिवछत्र अर्पण करण्यात येणार असल्याचे नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button