Nashik

नाशिक जिल्हायतील महा ई सेवा केंद्र संचालक तर्फे मा मुख्यमंत्री साह्यता निधीस रु ५१०००/- ची आर्थिक मदत

नाशिक जिल्हायतील महा ई सेवा केंद्र संचालक तर्फे मा मुख्यमंत्री साह्यता निधीस रु ५१०००/- ची आर्थिक मदत

सुनिल घुमरे

संबध जगावर कोरोना महामारी चे संकट ओढवलेले असतांना विविध स्थरातील नागरिकांना याचा आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. या साठी सरकार तर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येतआहे. नाशिक जिल्हायतील महा ई सेवा केंद्र मार्फत विविध शासकीय योजना ह्या स्थानिक पातळी वर नागरिकांन पर्यंत पोचवल्या जात असतात. कोरोना चे संकट या महा ई सेवा केंद्र चालक वर देखील ओढवला आहे. शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मागता केवळ सामाजिक बांधिलकी, परिस्थितीचे गांभीर्य समजून नाशिक जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र संचालक चे वतीने मा मुख्यमंत्री साह्यता निधी ला रु ५१०००/- (अक्षरी रु एकावन्न हजार रु मात्र) इतक्या रकमेचा धनादेश मा जिल्हाधिकारी साहेब श्री सुरज मांढरे साहेब यांचे कडे ई-जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री चेतन सोनजे सर यांचे मार्गदर्शनाखाली सुपूर्त करण्यात आला.

आर्थिक मदतीसह गरजूंना मोफत मास्क देखील वाटप करण्यात आले. यावेळी महा ई सेवा केंद्र चे प्रतिनिधी श्री रवि खैरे, श्री रविंद्र गायकवाड, श्री अनिल आठवले, श्री रोहित सकाळे, श्री सागर बेदरकर, सर आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button