श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ ,पंढरपूर संचलित विवेक प्राथमिक विद्यालयात मोफत पाठयपुसतक वाटप
प्रतिनिधी रफीक आत्तार
महाराष्ट्र मध्ये कोरोना महामारी च्या महाभयंकर रोगाने थैमान घातला असून त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरांमध्ये शासनाकडून आलेल्या पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आव्हान केले की जोपर्यंत शासनाचे आदेशानुसार शाळा व महाविद्यालय व प्राथमिक शाळा चालू होत नाही तोपर्यंत पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसकान होऊ नये म्हणून आपल्या घरामध्ये अभ्यास व गृहपाठ घ्यावा व घरामध्ये मास्क व सॅनिटायझर चे वेळेत वापर करावे विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या आरोग्याची व परिसराची काळजी घ्यावी सुरक्षित रहा घरी राहा असे आव्हान मा नगरसेवक संजय निंबाळकर यांनी केली यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर, माजी शिक्षण सभापती बशीर भाई तांबोळी पंढरपुर मार्केट यार्ड कमिटी संचालक सिकंदर भाई बागवान, सौ जमदाडे मँडम, सौ अटकळे मँडम, सौ दळवी मँडम व पालक उपस्थित होते.






