Ahamdanagar

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या करीत असलेली जी आँडिओ क्लीप व्हायरल केली आहे.. भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न :  आमदार निलेश लंके

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे ची आत्महत्या करीत असलेली जी आँडिओ क्लीप व्हायरल केली आहे. ती भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न : आमदार निलेश लंके

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधीच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची जी क्लीप अमरावतीच्या आत्महत्या केलेल्या वनाधिकारी मयत दिपाली चव्हाण यांना उद्देशुन व्हायरल केली आहे ती क्लीप म्हणजे तहसीलदार ज्योती देवरे यांचा भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे असे पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की आठ दिवसापुर्वी तहसीलदार देवरे यांच्या वर काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तसा अहवालही नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने मुंबईला पाठवला आहे. या अगोदर ही देवरे यांनी या स्वरुपाचे अनेक प्रकार केलेले आहेत. माझ्या समोर देवरेच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी आल्या त्याचवेळी त्यांना व्यक्तीगत स्वरूपात सुचित करण्यात आल्या होत्या. मला या प्रकरणातुन वाचवा नाहीतर मी आत्महत्या करीन असे मेसेज तहसीलदार देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्या मोबाईल वर रात्री-अपरात्री पाठवून आत्महत्येची धमकी दिली होती. असा ड्रामा त्यांनी मालेगाव आणि अमळनेर येथे बदली असताना केलेला होता. तहसीलदार ज्योती देवरे ज्या विभागात काम करतात त्या विभागातील अधिकाऱ्यांनाही दोषी धरतात. निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आणि इतर अधिकारी या सर्वांना दोषी धरतात हा आजवरच्या कामाचा अनुभव आहे. आपन स्वतः फार मोठे साधुसंत असल्या सारखे काम करतो, आणि सर्व चुकीच्या पध्दतीने काम करतात असे भासवन्याचा तहसीलदार यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. तहसीलदार देवरे यांच्या वरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत,त्यांची सखोलपणे चौकशी सुरू आहे. आपला बचाव करण्यासाठी तहसीलदार देवरे यांचा केविलवाणा प्रयत्न आहे असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. तहसीलदार देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी क्लीप पाहून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याप्रकरणी तात्काळ तोडगा काढून अधिकाऱ्यांना दिलासा द्यावा असे कळवले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महिला अधिकारी वर्गात वादळ निर्माण झाले आहे. तहसीलदार देवरे या प्रत्येक ठिकाणी जाऊन वादग्रस्त राहून कायम चर्चेत राहिल्या आहेत. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा.

संबंधित लेख

Back to top button