Amalner

? गणपती विसर्जन आणि मोहरम च्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचे शक्ती प्रदर्शन….

? गणपती विसर्जन आणि मोहरम च्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचे शक्ती प्रदर्शन….

आज रोजी गणपती विसर्जन व मोहरम या सणाच्या अनुषंगाने पोलीस रूट मार्च (शक्ती प्रदर्शन) करण्यात आले.सध्या संपुर्ण देशात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या धर्तीवर संचारबंदी लागू केली आहे.

आता गणेश विसर्जन आणि मोहरम या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर आज अमळनेर येथे अमळनेर पोलिसांनी पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि निरीक्षक आंबदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च करण्यात आला. रूट मार्च हा झामी चौक परिसर, कसाली मोहल्ला परिसर, सराफ बाजार, मार्केट परिसर व गांधलीपुरा या भागातून काढण्यात आला. यात RAF रॅपिड ऍक्शन फोर्स २ अधिकारी ९२ कर्मचारी RCP पथक- एकस्ट्रायकिंग फोर्स- एक अमळनेर पोलीस स्टेशन कडील ४ अधिकारी ४५ कर्मचारी होमगार्ड १४ इ चा समावेश होता.

सदर पोलीस रूट मार्च मध्ये पीआय श्री.अंबादास मोरे, API ढोबळे, PSI सूर्यवंशी, PSI लबडे गोपनीय अंमलदार डॉ. शरद पाटील, पोना दीपक माळी, रविंद्र पाटील, हितेश चिंचोरे इ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button