Amalner: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे थकलेले हप्ते मिळावेत.. मारवड परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मांडली तहीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांकडे व्यथा…
अमळनेर वंचित असलेल्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील
शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले.
केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मात्र तालुक्यातील मारवड, गोवर्धन व बोरगाव या गावातील अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून देखील ते १२,१३ व १४ व्या हप्त्याच्या लाभापासून वंचीत आहेत. थकीत हप्ते देण्यासाठी टाळाटाळ होत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
वरील तिन्ही गावातील वंचीत शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवून देखील त्यांना मदत मिळाली नाही. म्हणून शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे थकीत हप्त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी निवेदन दिले. निवेदनावर मारवड येथील दिलीप पाटील, पंढरीनाथ पाटील, सुरेश लोहार, जगन्नाथ लोहार, अशोक कोळी, अनिल मुंदडा, राजेंद्र पाटील, हिम्मत बाविस्कर, उषाबाई पाटील, संजय पाटील, सिंधुबाई बडगुजर,हिरामण चव्हाण, रमेश गुरव, प्रकाश पाटील, वसंत पाटील, पंडित पारधी, छोटू कुंभार बोरगाव येथील श्रीराम पाटील, किसन शिंदे, बापू महाले यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.






