Maharashtra

सगरोळी येथिल बँक आँफ महाराष्ट्र शाखेतुन एक कोटी पाच लाख रुपये चे पिक कर्ज वाटप

सगरोळी येथिल बँक आँफ महाराष्ट्र शाखेतुन एक कोटी पाच लाख रुपये चे पिक कर्ज वाटप

नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील बँक आँफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँके मार्फत चालु वर्षामध्ये कोरोनाच्या अटी व नियमाचे पालन करीत पीक कर्ज मागणीसाठी बँक आँफ महाराष्ट्र बँक सगरोळी ता. बिलोली शाखेत प्राप्त २५० अर्जापैकी १५८अर्ज टप्या टप्याने निकाली काढून एक कोटी पाच लक्ष रुपयाच्या पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती सगरोळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री सी.नागेश यांनी दिली आहे.

गेल्या जूलै महिण्या पासून बँक आँफ महाराष्ट्र बँके मार्फत नविन कर्ज मागणी करणाऱ्या शेतक ऱ्याना सुरवातीला कर्ज वितरण करण्यात आले याच सोबत ज्या जुण्या कर्जदारास कर्ज माफीचा फायदा मिळाला आहे अशाही शेतकऱ्यांना नविन कर्ज देण्यात येत आहे.

बँकेत एकाच वेळी अनावश्यक गर्दी होऊ नये या साठी शाखा व्यवस्थापक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन करीत पिक कर्जचे वाटप करित आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button