Faijpur

हौतात्म्याच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

हौतात्म्याच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : 1857 च्या स्वातंत्र्यलढयाच्या पहिल्या उठावापासून अनगिणत स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करून स्वातंत्र्यलढ्याची ज्योत तेवत ठेवली. जालियनवाला बाग हत्याकांडातून क्रुरकर्मा जनरल डायर याच्या अत्याचाराला न जुमानता असंख्य शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून मिळालेले भारत भूमीचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे व समाज संघटन करून संपूर्ण विश्वात देशाचा मान वाढविन्याची जबाबदारी प्रत्येकाची असून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाने कमीत कमी 75 स्वातंत्र्य लढ्यातील शुरवीरांचे जीवन चरित्र वाचून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविले पाहिजे. यासोबत ‘व्होकल फोर लोकल’ हे ब्रीद समोर ठेवून जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. वसुंधरेला प्लास्टिक पासून मुक्त करावे असे आवाहन लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना एककाच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व राष्ट्रीय छात्र सेना एकक, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जालियनवाला बाग स्मरण दिवसाच्या निमित्ताने आयोजित वेबिनार मध्ये ते बोलत होते. यात 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन व प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय, डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत यांच्यासोबत 60 एनसीसी कॅडेटस यांनी या वेबिनार मध्ये सक्रियपणे सहभाग घेतला. यात लेफ्टनंट डॉक्टर राजपूत यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद करून भारत भूमीचे स्वातंत्र्य अनगिनत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून प्राप्त झाले असून देशाच्या विकासात प्रत्येकाने आपापल्या परीने सहयोग द्यावा. सद्यस्थितीत कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावाने देशाला घट्ट विळखा दिला असून प्रत्येकाने आपली स्व जबाबदारी ओळखून कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. वेबिनार च्या यशस्वीतेसाठी कर्नल प्रवीण धीमन,प्राचार्य डॉ पी आर चौधरी, प्रशासकीय अधिकारी कर्नल नाशित, सुभेदार मेजर कोमलसिंग यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button