Amalner

दि. २८ नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन असून तो बहुजन समाजाने साजरा करावा – विलासराव पाटील

दि. २८ नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन असून तो बहुजन समाजाने साजरा करावा – विलासराव पाटील

जळगांव प्रतिनिधी:- दि. २८ नोव्हेंबर हा म. जोतीराव फुलेंचा स्मृतीदिन आहे. हा दिवस बहुजन समाजातर्फे महाराष्ट्रभर साजरा केला जातो. म. फुलेंचे शैक्षणिक कार्य विचारात घेता हा दिवस “शिक्षक दिन’ म्हणून साजरा करावा असे आवाहन ओ.बी.सी. विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनचे प्रदेशअध्यक्ष तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले आहे.

महात्मा जोतीराव फुले हे संपूर्ण भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी स्वतः दहा वर्षे |ख्रिस्ती मिशनरांच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले होते. परंतु तेथील शिक्षण हे स्वदेशी नव्हते.म्हणूनच त्यांनी मुलींसाठी पहिली स्वदेशी शाळा व दिनदलितांसाठी दुसरी शाळा काढली. मुलींना
शिकविण्यासाठी शिक्षिका मिळत नाहीत म्हणून स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीआईना शिक्षण देऊन शिक्षिका केले. पर्यायाने भारतातील पहिली स्त्री शिक्षिका घडवली. प्राथमिक शिक्षण हे १२ व्या वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे असावे, अशी मागणी सर्वप्रथम केली. या मागणीची उपयुक्तता पाहणीसाठी हंटर
कमिशन नेमण्यात आले होते. त्यास त्यांनी निवेदन देऊन या मागणीची योग्यता सिध्द करून दाखविली.
त्यांनी सत्यशोधक चळवळ स्थापन केली होती. हीच भारतातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली पहिली चळवळ होती. ही चळवळ म्हणजे खेडूतांना शिक्षण नि ज्ञान देऊन त्यांच्या ठायी असलेली अज्ञानाची निपुर्वग्रहांची जळमटे झटकून टाकून आधुनिक संस्कृतीचे आणि ज्ञानाचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी
एक सामाजिक प्रबोधीनी होती. अश्या महान कार्य करणाऱ्या जोतीराव फुलेंचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन विलासराव पाटील, संजय खलाणे, काशिनाथ माळी, ईश्वर महाजन,अनिल सोनवणे, प्रविण पाटील, सतिष वैष्णव, प्रा. जितेंद्र पगारे, वासुदेव माळी, सौ. वसुंधरा लांडगे, व्ही.
आर. महाजन यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

——————–

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button