Amalner

Amalner: रणधुमाळी 2024: म.वि.आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी व स्टेट सिक्युरिटी गार्ड & जनरल वर्क युनियनचा जाहीर पाठिंबा..

Amalner: रणधुमाळी 2024: म.वि.आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी व स्टेट सिक्युरिटी गार्ड & जनरल वर्क युनियनचा जाहीर पाठिंबा..

अमळनेर:- अमळनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असून विविध संघटना आपला पाठिंबा जाहीर करीत आहेत.
या आधी स्टुडंट्स असोशिएशनने डॉ. अनिल शिंदे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले होते. त्यानंतर आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्याकडून डॉ. शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी डॉ. शिंदे हे योग्य उमेदवार असल्याचे कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पाठिंब्याचे पत्र डॉ. शिंदे यांना देण्यात आले.

महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड अँड जनरल वर्क युनियनने दिला पाठिंबा,

महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड अँड जनरल वर्क युनियनने पत्र देऊन डॉ. शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी युनियनचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button