Amalner

Amalner: भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रतोदपदी खासदार स्मिता वाघ

Amalner: भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रतोदपदी खासदार स्मिता वाघ

जळगाव लोकसभा मतदारसंघातुन अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर-भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभेत प्रतोदपदी खासदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या समितीत 17 जणांमध्ये स्मिता वाघ एकमेव महिला खासदार आहेत.
स्मिता वाघ या पहिल्यांदाच खासदार झाल्या असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात भरघोस मतांनी त्या विजयी झाल्या आहेत.स्मिता वाघ या एक सक्षम महिला नेत्या आहेत याआधी विधानपरिषद सदस्य,जिल्हा परिषद अध्यक्ष यासारख्या महत्वपूर्ण पदांवर काम केल्याने भाजपा च्या संसदीय समितीने पहिल्या वेळी खासदार असतानाही त्यांच्यावर प्रतोद पदाची महत्वपूर्ण जवाबदारी टाकली आहे.मुख्य प्रतोद पदी डॉ संजय जयस्वाल तर स्मिता वाघ यांच्या सह १६ खासदारांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यानिमित्ताने जळगाव मतदारसंघास मोठा बहुमान मिळाल्याने स्मिता वाघ यांचे मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील,केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे तसेच महायुतीचे सर्व आमदार सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button