Maharashtra

भिगवण येथे शिवभोजन थाळीची सुरुवात

भिगवण येथे शिवभोजन थाळीची सुरुवात .

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:इंदापुर तालुक्यातील भिगवण हे ठिकाण म्हणजे रहदारीचे ठिकाणी आता शिवभोजन थाळी मिळणार असुन केवळ पाच रुपया मध्ये स्वादिष्ट जेवण उपलब्ध करून दिले अाहे.ही थाळी ११ ते ३ या वेळेत उपलब्ध आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व तहसिलदार सोनाली मेटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेस सुरवात करण्यात आली.मा.श्री.उद्गव ठाकरे यांनी गरजु व गरीब लोकांना शिवभोजन थाळीची घोषणा केलेली.ही घोषना या लाॅकडाऊन च्या कालावधीत गरजु व गरीब लोकांणा खुप उपयोगी ठरताना दिसत आहे.यामध्ये दोन चपाती,भात,वरण आणि एक भाजी असा मेनु आहे.तसेच इंदापुर,कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापुर,निमगाव केतकी या ठिकाणी चालु आहे.

या शुभप्रसंगी भिगवण पोलिस स्टेशनचे अधिकारी श्री जीवन माने, आरोग्य विभाचे अधिकारी डाॅ.पोळ माॅडम, डाॅ.मोरे, जिल्हा. प.सदस्य श्री.हनुमंत बंडगर, कृषि उत्पन्न.बा.स. संचालक श्री.आबासाहेब देवकाते, सरपंच सौ.अरुणा धावडे, उपसरपंच सौ.ललिता जाडकर, मनोज राक्षे, सचिन भोगावत, हेमंत निबांळकर, बापु थोरात, आण्णासाहेब धवडे, संतोष धवडे, लक्ष्मण कुटे, धनंजय थोरात, अमर धावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button