Maharashtra

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस हस्तगत

स्थानिक गुन्हे  शाखेला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस हस्तगत 

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस हस्तगत

चोपडा शहरातील एस टी बस स्टॅन्ड वर दोन इसम अंदाजे २० ते २५ वयोगटातील बलवाडी ते चोपडा  बस मध्ये येणार असुन त्यांचे कडे  गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस आहेत बाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोहेकॉ . नारायण पाटील , रामचंद्र बोरसे , मनोज दुसाने , प्रविण हिवराळे यांना मिळाली होती .  
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री . बापू रोहम यांनी पोलीस अधीक्षक डॉ . श्री . पंजाबराव उगले ,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती . भाग्यश्री नवटके , अपर पोलीस अधीक्षक श्री . सचिन गोरे , सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री . सौरभ अग्रवाल यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री . व्ही . पि . लोकरे , पोहेकॉ . जितेंद्र सोनावणे , सुनील पाटिल , ज्ञानेश्वर जवागे  , प्रदीप राजपूत , प्रकाश मथुरे , योगेश शिंदे , प्रमोद पवार , शुभम पाटिल ,शेषराव तोरे ,निलेश लोहार , योगेश पालवे अशांनी चोपडा एस टी बस स्टॅन्ड वर सापळा लावला होता  . बलवाडी ते चोपडा  बस चोपडा स्टॅन्ड वर आली असता , बस मधुन प्रवाशी उतरत असतानां बातमी प्रमाने दोन्ही  वर्णनाचे इसम मिळून आले . त्यांचे कडील बॅग मध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल ( कट्टा ) व ०५ जिवंत काडतुसे मिळून आले .  आरोपी  १) तुषार पिताजी चव्हाण वय -२३,रा . भोसे तालुका – कर्जत .जिल्हा – अहमदनगर , हल्ली मुक्कामी – भेकराई नगर , फुरसुंगी , हडपसर पुणें , २) संतोष अशोक माळी वय – २१ , रा . बालाजी नगर ,हडपसर , पुणे याचे कब्जात अनधिकृत एक गावठी पिस्तोल व ०५ जिवंत काडतूस मिळून आल्याने ते ताब्यात घेऊन त्यांचे  विरुद्ध चोपडा  शहर पोलीस स्टेशन भाग -६ गु र न . ८३/२०१९ भारतीय हत्यार कायदा – ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button