खरा कोरोनायोद्धा लढतोय कोरोनाच्या विळख्यात ..मात्र सन्मान, चमचेगिरी करणाऱ्यांच्या गळ्यात
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर : तालुक्यात कोरोनाचा जास्त फैलाव असल्याने रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच प्रशासन देखील युद्ध पातळीवर जोमाने काम करत आहे. त्यात लढणारा खरा खुरा कोरोना योद्धा डॉक्टर,पोलीस,पत्रकार, सफाई कर्मचारी व शासकीय वरिष्ठ कर्मचारी व काही जीवाला जीव देणारे सामाजिक कार्यकर्ते हे देखील आपल्या जीवाची पर्वा न करता लोकसेवेसाठी रस्त्यावर उतरले आहेत तसेच काही आरोग्य खात्यातील डॉ नर्स , हे आपले चिमुकले मुले घरी सोडून बाहेर कोरोना शी दोन हात लढत आहेत. जागाचा पोशिंदा जो दिवस रात्र एक करतो स्वतः उपाशी पोटी झोपतो मात्र अश्या संकटात देखील आपलं अन्न धान्य जनतेला पुरवतो तो नाही का कोरोना योद्धा ? का नाहि यांचा सन्मान ? कोरोना काळात जीवाची पर्वा न करणारे काही आज कोरोनाशी दोन हात खेळत घरी परतले तर काही दगावले आहेत.
मात्र साध्यची परिस्थिती पाहता बघायला गेले तर *आयजी ना जीव वर बायजी उधार आणि फोटो काढाले पुढे तयार* ‘करणारा करो मरनारा मरो’ हे चित्र पाहता खिशात हात घालून आपल्या कपड्याला डाग न लागू देणारा चमचेगिरी करणारा *तुम लढो हम कपडे सांभालते है* असे पाखंडी कोरोनायोद्धा म्हणुन सन्मानीत होत आहे ही वस्तुस्थिती आज तालुक्यात पाहायला मिळते आहे. सन्मान करणाऱ्यांनी असे न करता पूर्ण चौकशी करुनच योग्य व्यक्तीसच तो द्यावा म्हणजे त्याचा मान राखला जाईल. अशी मागणी तालुकावासी करीत आहेत.






