Amalner

अमळनेर:विवाहित महिला बेपत्ता..!

अमळनेर:विवाहित महिला बेपत्ता..!

अमळनेर येथील वसई देवी मंदिराजवळ राहणारी दोन मुलींची आई असलेली विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथील वसई देवी मंदिराजवळ वास्तव्यास असणारी ३४ वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन मुलींना घरी सोडून
मी गावातून जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेली. बराच वेळ घरी न परतल्या मुळे घरच्या लोकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पण ती मिळून आली नाही.म्हणून तिच्या पतीने दिलेल्या तक्रारी नुसार पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हे कॉ सुनील हटकर करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button