आंदोलन इशार्यानंतर स्मार्ट सिटीला जाग, अखेर सिबीएस वरील सिग्नल डाव्या बाजूला जाण्यासाठी रस्ता केला मोकळा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक: स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीने नाशिक मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सीबीएस येथील चौकात सिग्नल ची डावी बाजू वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती यामुळे डावीकडे जाणारी वाहने खोळंबून तिथेच उभे राहत होती, डावीकडे उभी राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती यासाठी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सातत्याने स्मार्ट सिटी प्रशासनासोबत निवेदन देऊन पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहाराची सकारात्मक दृष्टिकोनातून दखल घेऊन स्मार्ट सिटी प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुमंत मोरे यांनी सिग्नल ची डावी बाजू असलेल्या ठिकाणी जे पेवरब्लॉक होते ते संपूर्ण पेवरब्लॉक काढण्याचं काम सुरू केले आहे.
ज्यामुळे नाशिककरांना होणारा जो त्रास वाहतूक कोंडीचा , प्रदूषण चा व वेळेचा खोळंबा थाबनार आहे.
डावीकडील मार्ग मोकळा झाल्याने होणारी वाहनांची कोंडी ही कमी झाली आहे.. यासाठी आज नाशिककर नागरिकांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुमंत मोरे यांचा वृक्ष व पुस्तक देऊन , सन्मान केला . आभार मानले.तसेच ज्या ठिकाणी पेवर म्हणजे रस्ता मोकळा केला ज्या ठिकाणी डावी बाजूची वळण बंद केली होती ती मोकळी करण्यास सुरुवात केलेली आहे केलेल्या ठिकाणी नागरिकांना वाहनधारकांना खडीसाखर वाटप करून रस्ता मोकळा झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात केला यात प्रामुख्याने निशिकांत पगारे , काँ राजू देसले, योगेश बर्वे, योगेश कापसे, प्रा सोमनाथ मुठाळ, ॲड प्रभाकर वायचळे, संजय निकम, आयाज काझी, आदी सर्व कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाचे कौतुक करून आभार मानले. व येणाऱ्या काळात वाहतूकोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.






