Amalner: सराफ बाजार येथील विद्युत पोल धोकादायक दुरुस्तीची नविद शेख यांची मागणी
अमळनेर सराफ बाजार, अंदरपुरा येथील गरीब नवाज पान सेंटर जवळील महावितरण कंपनीचा पोल क्रमांक-७८४ मधूनच वाकलेला स्थितीत असून अत्यंत धोकादायक बनला आहे , हा पोल कधिही मेन सर्विस वायरसह रस्त्यावर कींवा दुकानावर कोसळु शकतो. विद्युत खांब मुख्य रस्त्यावर असल्याने लहान मुलं, (शाळेत जाणारी), मोठी माणसं, म्हातारी माणसं नेहमी या परिसरात ये-जा करत असतात. ह्या भागात दोन-तीन दिवसापूर्वी वादळी वारामुळे स्पार्कींग झाली. काही अनर्थ घडु नये म्हणून विद्युत विभागाला आतापर्यंत अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही विभागाने आतापर्यंत या तक्रारीकडे जाणून दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे महावितरण कंपनी ने हे विद्युत खांब बदलून कींवा दुरुस्त करुन द्यावेत असे परिसरातील अनेक नागरीकांचे म्हणणे आहे.







