खिदमते मिल्लत फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवन गौरव सोहळा”संपन्न
सलीम पिंजारी
फैजपूर– फैजपूर येथील खिदमते मिल्लत फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवन गौरव सोहळा” खादीमे मिल्लत पुरस्कार सोहळा”दि २ जानेवारी रोजी फैजपूर येथे पार पडला.
फैजपूर येथील खिदमते मिल्लत फाउंडेशन फैजपूर शहरात सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी या फाउंडेशन तर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते याच पार्श्वभूमीवर दि २ जानेवारी २०२०रोजी दुपारी २ वाजता फैजपूर येथील महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृह येथे खिदमते मिल्लत फाउंडेशन तर्फे ” खादीमे मिल्लत पुरस्कार ” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ शिरीष चौधरी तर उद्घाटक म्हणून अब्दुल करीम सालार होते तर व्यासपीठावर मौलाना शरीफ अहेमद, डॉ अब्दुल जलील,मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शोएब मोहंमद खान, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर मोहंमद आरिफ यांनी केले यावेळी धार्मिक,शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य, राजकीय,पत्रकारिता,साहित्य,शायरी,जीवनगौरव या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ” खादीमे मिल्लत पुरस्कार”मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले त्यात “खादिमे मिल्लत पुरस्कार” धार्मिक श्रेत्र–कारी बदिऊज्ज़मा,मुफ्ती अरशद अली शौकत अली,हाफीज़ हमिदउद्दीन फलाही शैक्षणिक क्षेत्र–आर क्यु शेख,इस्माइल खां तुकडु खां तडवी,
समाजिक क्षेत्र–शेख इकबाल हुसैन शेख हसन, अमिनुद्दीन शेख युसुफ,आरोग्यं क्षेत्र- डॉ मुदस्सर नजर शेख अ नबी,डॉ तनवीर अहमद शेख निसार,डॉ इमरान अखतर शेख अ रऊफ,राजनीतिक क्षेत्र–माजी उपनगराध्यक्ष शहेनाज बी शेख युसुफ, नगरसेविका नफीसा बी शेख ईरफान,साहित्य क्षेत्र–सलीम खान इस्माइल खान,वसीम अकील शाह,शायरी क्षेत्र–मरहुम रफीक आदिल,रईस फैज़पुरी,पत्रकारिता क्षेत्र–समीर तडवी,शेख कामील अ रहमान,जिवन गौरव पुरस्कार-मरहुम आर एम शेख,अब्दुल करीम सालार,अब्दुल्ला शेख रसूल,हयात खान वाहेद खान यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला माजी नगरसेवक शेख जफर,काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शेख वसिम जनाब,सैय्यद असगर,इरफान शेख,जाविद जनाब,जलील हाजी अब्दुल सत्तार, आसिफ मॅक्निकल,मुख्याध्यापक अब्दुल रहीम सर आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी
फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर मोहंमद आरिफ,
उपाध्यक्ष सैय्यद फारुक सैय्यद फकिरा, सचिव इमरान खान,सहसचिव कामिल खान, खजिनदार शेख शाफिक शेख बाबू ,सल्लागार शेख अखतर शेख युसूफ ,सदस्य नाजीम शेख गफ्फार यांनी परिश्रम घेतले
————————————————————-






