Maharashtra

धनाजी नाना महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी मार्फत एक दिवशीय ऑनलाइन एफ डी पी यशस्वीपणे संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी मार्फत एक दिवशीय ऑनलाइन एफ डी पी यशस्वीपणे संपन्न

प्रतिनिधी सलीम पिंजारी

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात आय क्यू ए सी अंतर्गत एक दिवशीय ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला. जगभरात कोरोना विषाणूच्या पादुर्भावातून जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत असतांनाच भविष्यकाळातील अध्ययन अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदल लक्ष्यात घेता मास्टरसॉफ्ट इ आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, नागपुर यांच्या सौजन्याने एम्पॉवरिंग टीचर विथ मायक्रोसोफ्ट टीमस अंड मास्टरसॉफ्ट आय टी एल इ मॉड्युल एल एम एस या विषयावर आयोजित ऑनलाइन एफ डी पी च्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी हे होते तर उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे प्र-कुलगुरू प्रा पी पी माहुलीकर याच्या सोबत कुलसचिव प्रा बी व्ही पवार, तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, चेअरमन मा श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा चेअरमन प्रा के आर चौधरी, सचिव प्रा एम टी फिरके प्रा पी एच राणे, श्री मिलिंद वाघूळदे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य तथा आय क्यू ए सी समन्वयक प्रा डॉ उदय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या एकदिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चे संयोजक प्रा डॉ ए के पाटील, समन्वयक, ऑनलाईन एफ डी पी प्रा एच जी नेमाडे, आयोजन सचिव प्रा राकेश तळेले, प्रा शिवाजी मगर, डॉ हरीश तळेले हे होते.
उद्घाटन समारंभात प्र कुलगुरू प्रा पी पी माहुलीकर यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त करीत यातून शिक्षक जे प्रशिक्षण घेतील याचा लाभ विद्यार्थ्यांना होऊन समाजात नवयुग क्रांती घडेल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री शिरीषदादा चौधरी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही शिक्षण क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या ऑनलाइन टिचिंग संदर्भातील ऑनलाइन एफ डी पी महाविद्यालयात आयोजित होत असल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करीत सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा मनापासून लाभ घ्यावा व विद्यार्थ्यांनचे चांगले जीवन घडवण्याची संधी चे सोने करावे असे आवाहन केले.

या ऑनलाइन एफ डी पी मध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

पहिल्या सत्रात, ‘कोविड-१९ चा मानसिक स्वास्थ्य व सामाजिक वर्तनातील परिणामांवर’ मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ एस व्ही जाधव यांनी विश्लेषणात्मक विवेचन केले. त्यात त्यांनी कोरोना व्हायरस च्या उगमापासून तर उपयात्मक लस सापडे स्तोवर जगभरातील विविध क्षेत्रातील लोकांवर याचा शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम कशा प्रकारे होतील व यातून स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य सांभाळून या संकटकाळात आरोग्य टिकवून कशाप्रकारे प्रगती साधता येईल यावर विवेचन सादर केले.
यासाठी परिस्थितीचे मूल्यमापन करून जबाबदारी स्वीकारण्याची सवय अंगी लावावी, नियमित व्यायाम व ध्यान करून मनाला व शरीराला सक्षम ठेवावे आणि मानसिक कणखरपणातून या महामारीला यशस्वीपणे सामोरे जावे असे आवाहन केले.

द्वितीय सत्रात मास्टरसॉफ्ट, नागपूर च्या वतीने मा चैताली चौधरी व मा शलाका सोळंखे यांनी ऑनलाइन डेमोस्ट्रेशन मायक्रोसॉफ्ट टीम सॉफ्टवेअर यावर तर मा मिलिंद मनसूते यांनी ऑनलाईन ट्रेनिंग ऑफ आय टी एल इ यावर प्रात्यक्षिक सहित सादरिकरण केले. यासोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सहभागी प्राध्यापकांच्या मनातील शंकांचे समाधान करून दिले. या संपूर्ण दिवसाचा सारांश आय क्यू ए सी समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ उदय जगताप यांनी केला. या ऑनलाईन एफ डी पी चा सर्व प्राध्यापकांना नक्कीच उपयोग होऊन भविष्यकाळातील ऑनलाइन टिचिंग चा उपयोग होईल असा आशावाद व्यक्त करून यशस्वी आयोजनाचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा शिवाजी मगर, प्रा राकेश तळेले , डॉ हरीश तळेले, प्रा हरीश नेमाडे, यांनी केले तर आभार प्रा डॉ ए के पाटील यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button