Nashik

जेष्ठ साहित्यीक नवनाथ गायकर सुर्योदय सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित

जेष्ठ साहित्यीक नवनाथ गायकर सुर्योदय सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक -: नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक, जेष्ठ पत्रकार , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष
नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना
सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांचा स्व.गोकुळचंद लाहोटी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ८ व्या वर्षाचा “सुर्योदय सेवाव्रती पुरस्कार” जेष्ठ साहित्यिक मा.श्री. लक्ष्मीकांत देशमुख, पुणे यांच्या शुभहस्ते
कांताई सभागृह, जळगाव येथे सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव यांच्या वतीने आयोजित
१ ल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनप्रसंगी प्रदान करण्यात आला.
यावेळी संमेलनाध्यक्ष श्रीमती प्रभाताई गणोरकर, संमेलनाचे आयोजक तथा मंडळाचे अध्यक्ष
सतीश जैन, नाशिक जिल्हाध्यक्ष सावळीराम तिदमे, सुत्रसंचालक रविंद्र मालुंजकर आदी उपस्थित होते.
वाढदिवसाच्या पुर्वसंध्येलाच हा पुरस्कार प्रदान झाल्याने दुहेरी व दुग्धशर्करा योग जुळून आला.
दरम्यान पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना गायकर यांनी सुर्योदय मंडळाचे जाहीर आभार मानत जबाबदारी वाढल्याचे नमूद केले आहे.
गायकर यांचे यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे, कोकण विभागाचे अध्यक्ष सतीश तोडणकर, माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, माजी पं.स.सभापती पांडुरंग वारुंगसे, पत्रकार शरद मालुंजकर, के.टी.राजोळे, शाहबाज शेख, माणिक गोहाड, कमलाकर बिडवे, निर्भिड जेष्ठ पत्रकार शांताराम भाऊ दुनबळे, नंदकिशोर गांगुर्डे, साहित्यिक प्रशांत भरवीरकर, प्रशांत केंदळे, नवनाथ पा. गाढवे, गौरव मांडे, संदीप मुसळे, साहेबराव उतेकर, शरद उतेकर, बापु खातळे, भिमराज खातळे, संजय खातळे, विष्णु पानसरे, पांडुरंग ढिकले, किरणकुमार आवारे, शांताराम भांगे, श्रीराम तोकडे, राजु आतकरी, गणपत मांगटे, पाटील, थोरात आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर व स्नेहीजणानीं अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button