Aurangabad

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या – जिल्हाधिकारी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या – जिल्हाधिकारी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : शेतकरी आत्महत्या होऊच नयेत यासाठी सर्वच यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात जागृती निर्माण करावी.
त्याचबरोबर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या.
जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारी 2.0 कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, स्वयंसेवी संस्थेचे जयंत पाटील, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button