दारु तस्करीसाठी प्रवासी ऑटो चा उपयोग
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे
शहरातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोचा बऱ्याचदा उपयोग केला जातो. पण सादीकचा आटो मात्र प्रवाशांची वाहतूक न करता दारूची वाहतूक करत होता. चंद्रपुर शहरात चालणारा ऑटो क्रमांक MH 34 BH 1484 हा वनी -वरोरा -चंद्रपूर असा चालायचा. ऑटोचालक हुशार असल्याने त्यामध्ये कधीच प्रवाशी बसवत नव्हता. पण मात्र वरोरा ठाण्यातील पोलीस निखिल कौरासे चौकात कर्तव्यावर असताना यांना ही बाब खटकली.
या कारवाईवरून दारू तस्करीची आणखी एक नवी शक्कल पुढे आली असून पोलिस देखील अचंबित झाले आहे.
पुढील कारवाई ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.






