Amalner

Amalner: एकलहरे येथील अवैध वाळू उपसाचा बळी पोटच्या मुलाला न्याय मिळविण्यासाठी भारती कोळी यांचे उपोषण…!

Amalner: एकलहरे येथील अवैध वाळू उपसाचा बळी पोटच्या मुलाला न्याय मिळविण्यासाठी भारती कोळी यांचे उपोषण…!

अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यातून बेकायदेशीर अति प्रमाणात वाळू उपसा केल्यामुळे पाण्याच्या डबक्यात मुलाचा बुडून दुर्दैव मृत्यू झाल्याने अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दोषीवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीबाई भरत कोळी यांनी 26 जानेवारी रोजी
प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात
केली आहे.
भारती कोळी यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जांवर अद्याप कोणतेही कार्यवाही झाली नाही. योग्य ती चौकशी करून संबंधितवर कारवाई करण्यात आलेले नाही. वारंवार तक्रार करून देखील मला मिळाला नाही म्हणून मला उपोषण करावे लागत आहे. तरी संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करत मला न्याय मिळावा, अशी मागणीभारती कोळी यांनी केली आहे.याअगोदर देखील भारती कोळी यांनी उपोषण केले होते पण त्यावेळी देखील फक्त आश्वासन देण्यात आले होते.

निवेदनावर राधेश्याम वसंत कोळी, किरण रामदास पाटील, सागर संतोष चौधरी, राकेश शिवाजी मोरे, प्रवीण मगन भोई, विनोद जगन्नाथ कोळी, अरुण देविदास भोई, गणेश जिजाऊराव कोळी, रवींद्र भगवान कोळी, समाधान सिताराम कोळी, परदेशी
शिवकुमार महाजन, भगवान दामू कोळी, चंद्रशेखर सूर्यवंशी, सुनील रजनी शिंपी, गोकुळ नामदेव बोरसे, रामराव गोविंदा पवार आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button