Dhule

मुकटी येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ.. सावधानता बाळगण्याचे गो ग्राम यात्रा समिती अध्यक्ष यांचे आवाहन…

मुकटी येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ.. सावधानता बाळगण्याचे गो ग्राम यात्रा समिती अध्यक्ष यांचे आवाहन…

ठोस प्रहार : ग्रा. प्रतिनिधी,मुकटी राहुल साळुंके,

सध्या परिस्थिती पाहता महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्ह्याचे कोरोना ने संक्रमीत होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
आणि त्यात आज दिवशी आपल्या मुकटी गावात कोरोना रुग्णांची संख्या 65-70 पर्यंत पोहचली आहे.व 4 रुग्ण देखील दगावले आहेत.त्यामुळे गावातील नागरिकांनी या विषयांचे गांभीर्य लक्षात घेतल पाहिजे.

सार्वजनिक कार्यक्रम मर्यादित लोकांमध्ये करावे,बाहेर निघताना तोंडावर मास्क(रुमाल)लावणे,लोकांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात व्यवस्थित धुणे,अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपला परिवार सुरक्षित ठेवू शकतो.आणि आपल्या सर्व्याच्या तत्परतेमुळे व सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे आपण आपले गाव कोरोना मुक्त करू शकतो असे आवाहन गो ग्राम यात्रा समिती अध्यक्ष अनिल मोरे व उपाध्यक्ष कल्पेश मोरे व सदस्य हेमंत साळुंखे,शैलेश परदेशी,महावीर जैन,मनोहर पाटील,भैय्या सूर्यवंशी,अविनाश चौधरी इत्यादींनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button