चांदवड उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकांवर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : चांदवड उपजिल्हा रुग्णालय परिसरात कोविड सेंटर येथे कै अरुण माळी रा खंडाळवाडी ता चांदवड हे उपचार घेणेसाठी आले असताना सदर रुग्णास श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता,त्याची पत्नी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनवणी करीत होत्या की पतीस अॅङमिट करून घ्या मात्र रूग्णालयात येथे बेड शिल्लक नाही त्यामुळे त्यांना हात लावू शकत नाही असे सांगण्यात आले
.सदरील रुग्णास इतरत्र कुठेही संदर्भित करण्यात आले नाही किंवा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही,या प्रकारास वैद्यकीय अधीक्षक जबाबदार असून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ उगले,पांडुरंग भडांगे,आबा गांगुर्डे,उमेश जाधव,विकी गवळी,सोमनाथ जाधव,राजाभाऊ अहिरे,प्रकाश शेळके,अशोक हिरे आदींच्या सह्या आहेत.






