विद्यार्थिनींनी श्रमदानातून सामाजिक बांधिलकी जोपासावी—प्रा.राजा जगताप
दारफळ येथे व्ही.जे शिंदे महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस शिबीराचे उदघाटक म्हणून वक्तव्य
उस्मानाबाद(प्रतिनिधी)
महाविद्यालयीन विद्यार्थी—विद्यार्थिनी यांना स्वालंबी व चारिञ्यसंवर्धन बणवन्यासाठी त्यातुनच त्यांच्याकडून समाजसेवा व्हावी यासाठी म.गांधीजींच्या जयंती दिनी म्हणजेच,२४सप्टेंबर १९६९पासुन राष्ट्रीय सेवा योजना स्थापन झाली आहे यामुळेचे विद्यार्थ्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवला जातो आपण व्ही.जे.शिंदे महिला महाविद्यालयातील सर्वजणी स्वयंसेविका असुन या गावात विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून गावात श्रमदान करून या गावाला सुंदर बनवावे व या शिबीरातील विद्यार्थिनींनी श्रमदानातुन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन व्ही.जे.शिंदे महिला महाविद्यालय उस्मानाबादचे यांच्या “राषट्रीय सेवा योजना विभागाचे ” सात दिवसाचे विशेष श्रम संस्कार शिबीराजे “निर्मल गाव व पर्यावरण संवर्धन”या थिमखाली मौजे दारफळ ता.उस्मानाबाद येथे उदघाटन प्रा.राजा जगताप(साहित्यिक उस्मानाबाद)यांचे हस्ते झाले.तेंव्हा त्यांनी केले आहे.
अध्यक्षस्थानी जि.प.शाळेचे हाके सर होते.यावेळी सरपंच सौ,बालिका गोवर्धन सुतार,उपसरपं सौ.ज्योती धर्मराज जाधव,हुकमत मुलाणी,प्रकल्पअधिकारी प्रा.विशाल मोरे,प्रा.शिवगोंडा पाटील,प्रा.विजया खुने,प्रा.पुजा हंगरगेकर,प्रा.अरविंद इंगळे उपस्थित होते.
प्रा,प्रमुख पाहुणे यांनी साविञीबाई फुले व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन केले.पुढे बोलतांना प्रा.राजा जगताप म्हणाले की राषट्रीय सेवा योजनेत समाजसेवेचे वृत्त घेऊन काम केल्यास स्वालंबी जीवन जगावे याची उर्जा मिळते.धाडस प्राप्त होते,आत्मविश्वास वाढिस लागतो.स्वसंरक्षणाची तागद येते त्यामुळे आपण विद्यार्थिनींनी समाजामध्ये वावरतांना निर्भयपणे व निर्भिडपणे वावरावे कोणत्याही संकटाचा सामना करावा त्याशिवाय पर्याय नाही.आपण विद्यार्थिनींनी या गावात वृक्षारोपन,व्यसनमुक्ती,कृषी जागृती,जलसंवर्धन ,जलव्यवस्थापन हे उपक्रम श्रमदानातुन राबवावे व दारफळकरांनी आपले काम पाहून शेवटच्या दिवशी गौरव करावा आशी या गावात सामाजिक बांधिलकी निर्माण करावी असे भावनिक आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करतांना हाके सर म्हणाले की,श्रमदानावेळी आमची शाळा सगळी मदत करेल या गावात श्रमदानातुन आपण स्वच्छता करणार आहात त्यामुळे समाधान वाटत आहे.
या शिबीरात शंभर विद्यार्थिनी सहभागी आहेत.सुञसंचालन प्रा.शिवगोंडा पाटील यांनी मानले.यावेळी गावातील प्रतिष्ठित व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






