Faijpur

दिपाली गृप व खान्देश नारीशक्ती तर्फे पत्रकारांचा सन्मान

दिपाली गृप व खान्देश नारीशक्ती तर्फे पत्रकारांचा सन्मान

फैजपूर (प्रतिनिधी):सलीम पिंजारी

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप तर्फे दिपाली गृप कार्यालयात फैजपूर परिसरातील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री.अरुण होले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.उपनगराध्यक्ष व गटनेते कलीम खान मण्यार,श्री.आर आर राजपूत सर,सौ.दिपाली चौधरी झोपे अध्यक्षा खान्देश नारीशक्ती गृप इ.होते.
पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ तर आहेतच पण त्याचबरोबर समाजातील चांगल्या घटकांची प्रसिद्धी आणि वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याच देखील महत्वाचे कार्य पत्रकार व वृत्तपत्र करीत असतात असे प्रतिपादन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केले.यावेळी फैजपूर परिसरातील पत्रकार सर्वश्री ललित फिरके, उमाकांत पाटील, फारुख शेख, संजय सराफ,नंदु अग्रवाल,शाकीर मलिक,समीर तडवी,सलीम पिंजारी,राजू तडवी,मुदस्सर नजर,कामील शेख,जाविद काजी, बंटी आंबेकर,अजय महाजन,एहसान कुरेशी, देवेंद्र झोपे,हभप रेवा चौधरी इ.उपस्थीत होते.सुत्रसंचालन गणेश गुरव सर तर आभार प्रदर्शन देवेंद्र झोपे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button