चिमूर,चंद्रपूर

२६ नोव्हेंबर रोजी चिमुरात संविधान सन्मान दिन समारोह आयोजित

२६ नोव्हेंबर रोजी चिमुरात संविधान सन्मान दिन समारोह आयोजित

चिमूर,
संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा(पैकू) चिमूर च्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान चौकातील आदर्श विद्यालयाचे मैदानावर संविधान सन्मान दिनाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडपीपरी पंचायत समितीचे केंद्रप्रमुख अविनाश शंभरकर राहणार आहेत
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाबुराव मडावीमहाविद्यालय देसाईगंज चे माजी प्राचार्य एस एन पठाण, राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्टी बौद्ध महिला मैत्री संघ नागपूर च्या मुख्य आयोजक पुष्पाताई बौद्ध, बल्लारपूर चे आंबेडकरी विचारवंत राजुभाऊ झोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
डॉ आंबेडकरांचे सामाजिक कार्य व भारतीय संविधान यांचा सहसंबंध, भारतीय संविधान व धम्माची सांगड, भारतीय संविधान हा भारताचा राष्ट्रग्रंथ या विषयावर होणाऱ्या कार्यक्रमात चिमूर विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार किर्तीकुमार भांगडिया, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे प्राचार्य कार्तिक पाटील, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महेंद्र लोखंडे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे
दुपारी एक वाजता ख्यातनाम गायिका संध्या किरण(डोमा)व वर्षा गोंडाने पवनी(सिंगोरी)ह्या भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम सादर करतील
दुपारी तीन वाजता होणारी बाईक रॅली संपूर्ण चिमूर शहरात आयोजित केली असून ही रॅली चिमूर शहरातील बुद्ध विहार, तुकडोजी महाराज, शाहिद बालाजी रायपूरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दाई जंगो रायताळ गोंडीय पेनठाना येथे माल्यार्पण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होईल
या कार्यक्रमात सुमारे पाच हजार संविधान प्रेमींची उपस्थिती राहील असा दावा आयोजकांनी केला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button