Nashik

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मालेगांव तालुका कमिटीने घेतली तहसिलदारांची भेट.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मालेगांव तालुका कमिटीने घेतली तहसिलदारांची भेट.

शांताराम दुनबळे

नाशिक-:कोरोना संकट व लाॅक डाऊन,पाच महिने कामधंदेबंद यामुळे सर्व सामांन्याप्रमाणे वारकरी कलावंत काही ज्यांची पहिल्यापासूनच आर्थिक परीस्थिती बेताची व त्यात कोरोना संकटाची भर यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद आहेत अशा काळात मृदुंगवादक,पेटीवादक,गायक,भालदार, चोपदार,विणेकरी, काही किर्तन प्रवचनकार,व्यासपीठचालकही खरोखर खूप मोठ्या आर्थिक परीस्थितीचा सामना करत आहेत. शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी एनजिओ मार्फत वा शासकीय स्वरुपात मदत करावी असे आवाहन अ.भा.वारकरी मंडळाचे मालेगांव तालुकाध्यक्ष हभपश्री बापू महाराज पवार पिंपळगांव दा.यांनी केले आहे.

यावेळी मालेगांवचे तहसिलदार मा.श्री. सी.आर.राजपुत सो.यांना वारकरी मंडळाचे वतीने निवेदन देण्यात आले. अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभपश्री.प्रकाश महाराज बोधले डिकसळ व जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी सर्व तालुकाध्यक्ष यांना तहसिलदार यांना निवेदन देण्यास सांगितले आहे.शासन नक्कीच या मागणीचा विचार करुन कलावंताना जिवनावश्यक किटचे लवकरच वाटप करील अशी अपेक्षा हभपश्री बापु महाराज पवार व मालेगांव तालुका वारकरी मंडळ यांनी केली आहे.रायगड जिल्ह्यातील १२०० वारकरी कलावंताना चार तालुक्यातून तहसिलदार स्तरावर मदत मिळाली आहे, तसी आपल्याकडेही मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button