नाशिकरोङ येथे कपडे दुकानास आग, कपडे व शालेय बॅगा जळाल्या
शांताराम दुनबळे
नाशिकरोड बस स्थानका जवळ असलेल्या कपडे व शालेय व प्रवाशी बॅगच्या दुकानाला काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक पणे आग लागलाने या आगीत मोठे नुकसान झाले आहे . तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले . सदरची आग ही शॉर्टसर्कीट मुळे लागली आसावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . बस स्थानकाजवळ असलेल्या नगरकर पेट्रोल पंपासमोर मित्र मंडळ सोसायटीच्या इमारतीतील पुढील बाजुस अनिल भाटीया व चंदु भाटीया यांचे भाटीया बॅग व कपड्याचे दुकान आहे . लॉकडाऊन मुळे सायंकाळी पाच वाजेला सर्व दुकाने बंद होतात , रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानकपणे दुकानातुन धुराचे लोट बाहेर येवू लागले . रस्तावर सामसुन होती परंतु धुराचे लोट बघून मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली . या दुकानास आग लागल्याचे समजताच काही वेळाने अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण आनण्यासाठी पाण्याचा मारा सुरु परंतु दुकान बंद आसल्याने वरच्या बाजुस काचा व शटर आसल्याने आग विझविण्यासाठी अडचण निर्माण होत होती , मात्र त्यानंतर कर्मचारी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केला घटना स्थळी प्रचंड गर्दी झाल्याने या ठिकाणी नाशिकरोड पोलिसांचा मोठा ताफा दाखल होऊन गर्दी हटविली . पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यास आली आले . यावेळी अग्निसमन दलाचे एम . एम.भदे , आर.टी. जाधव , ए.के. मांडे , राजु आहेर , आर . एन . दाते , एम.के. साळवे , विजय बागुल आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले .






