sawada

चर्मकार समाजासाठी हॉल बांधून मिळण्याची आ. चंद्रकांत पाटील यांचेकडे मागणी

चर्मकार समाजासाठी हॉल बांधून मिळण्याची आ. चंद्रकांत पाटील यांचेकडे मागणी

सावदा : सावदा येथे दि ११ रोजी विविध ठिकाणी मुक्ताईनगर विधानसभाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेटी दिल्या यावेळी शहरातील चर्मकार बांधवांनी त्यांची भेट घेऊन शहरात चर्मकार समाजासाठी लग्नकार्या साठी एक हॉल व त्यास संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी एका निवेदना व्दारे केली,
सावदा शहरात रावेर रोड वर चर्मकार समाजाची गट नं ९१३ ही जागा असून यावर चर्मकार समाज तसेच इतर हक्क अशी नोंद असून पूर्वी येथे एक समाजाचा कुंड होता आता ही जागा शहराचे अगदी नजीक असून याच ठिकाणी चर्मकार समाजचे लग्न तसेच इतर कार्यासाठी आमदार निधीतून एक हॉल तसेच त्यास संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी दि ११ रोजी समाजाच्या वतीने एक निवेदन देऊन करण्यात आली, यावर समजातील समाजिक कार्यकर्ते गजानन ठोसरे, भूषण मोरे, संजय ठोसरे, दिलीप ठोसरे, शांताराम ठोसरे, वसंत शेलार, सचिन ठोसरे यांचे सह समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत, दरम्यान समाजिक कार्यकर्ते गजानन ठोसरे यांनी आ. पाटील यांना चर्मकार समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागास असून त्यासाठी आपण लवकरात लवकर सदर विषय हाती घेऊन मार्गी लावावा असे निवेदन समाज तर्फे केले,
टीप – सोबत बातमीचा फोटो पाठवीत असून कृपया वापरावा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button