Amalner

?️ अमळनेर कट्टा… रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर ला इंजेक्शन देण्याची परवानगी द्या.

?️ अमळनेर कट्टा… रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर ला इंजेक्शन देण्याची परवानगी द्या.

अत्यंत तातडीचे व महत्वाचे
दि ३०-३-२१

माननीय अभिजित राऊत साहेब,
जिल्हाधिकारी, जळगाव

विषय:- रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर ला इंजेक्शन देण्याची परवानगी द्या.

संदर्भ – १)आपले दिनांक २२ मार्च २१ चे कोरोना उपचारासाठी चे नवीन आदेश
२) आपली दिनांक २८ मार्च २१ ची दैनिक दिव्य मराठीला प्रसिद्ध मुलाखात
३) दि २८ मार्च २१ दैनिक लोकमत मधील हॅलो जळगाव पान क्रमांक तीन वरील रेमडेसिव्हर वास्तव.

माननीय महोदय

आपण कोविड आटोक्यात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करीत आहात त्यासाठी आपले व आपल्या पूर्ण टीम चे अभिनंदन.

सर ,
रेमडेसिव्हर चा काळा बाजार फार मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्याची कारणे सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला असता जी माहिती समोर आली ती सुद्धा आपल्या निदर्शनास आणू इच्छितो व त्यावरील उपाय म्हणून काही सूचना मांडत आहे त्याचा कृपया सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा ही विनंती.

१) सर,आपण दिनांक २२ मार्च रोजी जे आदेश दिले आहेत त्यातील मुद्दा क्रमांक २ याच्यात स्पष्ट पणे नमूद आहे की एच आर सि टी मध्ये आठ ते पंधरा इतकी त्रीवता असणारा मूल्यमापन असेल व त्यास दुसरा कोणता आजार नसल्यास तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासत नसली तर रुग्णावर रेमडेसिव्हर इंजेक्शन क्लीनिकल जजमेंट आणि प्रोटोकॉल नुसार वेळीच उपचार करण्यात यावे तसेच इंजेक्शन देऊन निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून ने आण करावी.
आपले आदेश स्पष्ट आहे परंतु पुष्कळसे जनरल प्रॅक्टिशनर हे रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार करून कोविड टेस्ट सुद्धा करीत आहे त्या टेस्टमध्ये जर रुग्ण पोसॅटिव्ह-निगेटिव आढळून आल्यास परंतु स्कॅन मध्ये तिची त्रिवता ८ ते १५ चे मूल्यांकन मध्ये आल्यावर, तसेच रुग्णांना इतर आजार नसल्यास व त्यास कृत्रिम श्वासोसच ची गरज नाही म्हणून रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्शन घेण्याचा सल्ला जनरल प्रॅक्टिशनर देत आहेत.
जनरल प्रॅक्टिशनर चे प्रिस्क्रिप्शन वर मेडिकल स्टोर हे रेमडेसिव्हर इंजेक्शन देत नाही व तेथूनच काळ्या बाजाराला सुरुवात होत आहे.

अमळनेर शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिशनर हे काळ्या बाजाराने रेमडेसिव्हर विकत आणून स्वतः पेशंटला पुरवीत आहे किंवा त्याला घेण्यास भाग पाडीत आहे म्हणून आजही रेमडेसिव्हर इंजेक्शन २ ते ५ हजार रुपये पर्यंत विकले जात आहे वा हा प्रकार सर्रास पणे खासगी रुग्णालयात सुरू आहे.

आमची विनंती वजा सूचना आहेत खलील प्रमाणे.

१) रेमडेसिव्हर इंजेक्शन देण्याची परवानगी जनरल प्रॅक्टिशनर यांना सुद्धा देण्यात यावी तसेच त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर मेडिकल स्टोर वाल्यांनी ते इंजेक्शन देणे आवश्यक आहे.

२) खाजगी दवाखान्यात (परवानगी व बिना परवानगी) असलेल्या मेडिकल स्टोअर मधून रेमेडीसीवर इंजेक्शन १२००/- रुपयातच विकले जावे व जो कोणी त्या ठिकाणी जास्तीचे बिल आकारात असेल त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.

३)शहरात व ग्रामीण भागात जनरल प्रॅक्टिशनर हे रुग्णांचे सर्वतोपरी औषधोपचार करीत आहे परंतु रेमडेसिव्हर इंजेक्शन देता येत नसल्याने अथवा त्यांना मिळत नसल्याने रुग्ण गंभीर अवस्थेत येत आहे व त्या अवस्थेत त्या रुग्णास शासकीय रुग्णालय अमळनेर येथे पाठवले जात असल्याने मृत्यू दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

तरी कृपया आपणास विनंती की जनरल प्रॅक्टिशनर ला तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही अटी व शर्तीसह आपल्या दिनांक २२ मार्च २१ च्या आदेशाचे पालन करण्यासाठी एक वैद्यकीय आचारसंहिता तयार करून ती प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती.

सहकार्य अपेक्षित .

आपला स्नेही

(शेख नविद अहमद मुशिरोद्दीन)
तालुकाअध्यक्ष -राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा
अमळनेर जिल्हा,जळगाव.
मोबाईल ९९२११८१८८८
[email protected]

?️ अमळनेर कट्टा... रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर ला इंजेक्शन देण्याची परवानगी द्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button