Chandwad

चांदवडची चौफुली म्हणजे अपघाताला आमंत्रण…

चांदवडची चौफुली म्हणजे अपघाताला आमंत्रण…

उदय वायकोळे चांदवड

Chandwad : चांदवड शहरात एन्ट्री पॉईंट असलेली पेट्रोलपंप चौफुली म्हणजे नेहमीच गजबजलेली असते.शहरातून पेट्रोलपंप कडे जाण्यासाठी चौफुली ओलांडून म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ला ओलांडून जावे लागते तसेच इंद्रायणी कॉलोनी,भैरवनाथ नगर व इतर पंपाकडे जाणारे व्ययसायिक याच चौफुलीने वापर करतात.मुंबई आग्रा महामार्गवर चांदवड पंचायत समिती समोर गतिरोधक नसल्याने घाट उतरू येणारी वहाने सुसाट वेगाने येतात व सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वहाने थांबण्याचा प्रश्नच येत नाही,याच ठिकाणी वारंवार अपघात होत असतात मात्र ना सिग्नल यंत्रणा सुरू झाली ना गतिरोधक बसविण्यात आहे हे विशेष.
मनमाड चांदवड हुन नाशिककडे व मालेगाव कडे जाणाऱ्या नागरिकांना इकडे तिकडे पाहूनच क्रॉसिंग करावी लागते ,या परिसरात सिग्नल व गतिरोधक बसविण्याची मागणी राजाभाऊ अहिरे,रवींद्र बागुल यांनी काही दिवसांपूर्वी केली होती मात्र अजूनही दोन्ही कामे प्रलंबित आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button