Bollywood

?️ म्हणून ट्विटरवर ट्रेड होतोय ‘बॉयकॉट तांडव’…काय आहे तांडव..! हिंदू वादाचा एक्का..!ट्रेंडिंग वाढविण्यासाठी काय पण..!मालिका राजकीय..की..!

?️ म्हणून ट्विटरवर ट्रेड होतोय ‘बॉयकॉट तांडव’…काय आहे तांडव..! हिंदू वादाचा एक्का..!ट्रेंडिंग वाढविण्यासाठी काय पण..!मालिका राजकीय..की..!

सैफ अली खान, डिंपल कपाडिया अशी तगडी स्टारकास्ट असल्याने ‘तांडव’ या वेबसिरिजची ती प्रदर्शित होण्या आधीपासूनच जोरदार चर्चा होत होती.

त्याचे प्रोमो, टीझर बघून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. अली अब्बास जाफर दिग्दर्शित ही सिरीज अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली.

पण आता ही वेबसिरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे या सीरिजबाबत वादंग निर्माण झाला आहे.

या वेबसिरिज मधील एका दृश्याबद्दल ट्विटरवर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ट्विटरवर ‘बॉयकॉट तांडव’ हा हॅशटॅग वेगाने ट्रेंड होत आहे.

यामध्ये एक दृश्य आहे, ज्यात अभिनेता मोहमद झीशान अयुब जो रंगमंचावर भगवान शंकराची भूमिका साकारत आहे, त्याच्या तोंडी आझादी, व्हॉट द …?. असा एक संवाद आहे.

यातून हिंदू देवतांना लक्ष्य करून त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे ट्विटरवर ‘बॉयकॉट तांडव’ हा हॅशटॅग चालवण्यात येत आहे.

हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची ही नि र्मिती असून, 9 भागांची ही राजकीय मालिका आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button