Nashik

कादवा कारखाना स्थळी असलेल्या बी के कावळे विद्यालय येथे विविध उपक्रम

कादवा कारखाना स्थळी असलेल्या बी के कावळे विद्यालय येथे विविध उपक्रम

नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनिल घुमरे

विद्यार्थ्यांनी भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने आगळे वेगळे प्रेरणादायी उपक्रम राबवून आपल्या देशात मध्ये असलेल्या विविध समस्यांबाबत उद्बोधन व प्रबोधन करावे असे आवाहन बी के कावळे विद्यालय राजाराम नगर चे प्राचार्य श्री बी के शेवाळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना केले कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर या कार्य स्थळावरील बी के कावळे विद्यालय येथे भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासन नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभाग नाशिक यांनी आदेशित केल्यानुसार व दिलेल्या नियोजनाच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमा बरोबरच राष्ट्रीय एकात्मता व पर्यावरण जतन संवर्धन याबाबत जनजागृती व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहे त्याचाच भाग म्हणून आज बी के कावळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी उपक्रमात सहभाग घेऊन विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या होत्या श्रीमती उफाडे जे एन यांनी या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते या रांगोळी प्रदर्शना ची पाहणे विद्यालयाचे प्राचार्य बी के शेवाळे पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यांनी केली यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना प्राचार्य शेवाळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून देश प्रेमाबाबत जन जागृती करावी राष्ट्रीय एकात्मता व पर्यावरण या बाबत उपक्रम राबविल्यास नक्कीच त्याचा उपयोग देशात जनजागृतीसाठी होईल इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी अतिशय कल्पकतेने वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक रचने सह मुक्तहस्त देश प्रेमाचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या विविध प्रकारचे रंग संगती त्याचबरोबर आकार हे या रांगोळ्यांचे वैशिष्ट्य होते यातून दिले गेलेले सामाजिक संदेश हे विद्यार्थ्यांना अंतर्मुख करणारे होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button