Indapur

इस्तेमा” स्थळाची राजवर्धन पाटलांकडून पाहणी ! सर्वोतपरी मदत करण्याचे दिले आश्वासन.

इस्तेमा” स्थळाची राजवर्धन पाटलांकडून पाहणी ! सर्वोतपरी मदत करण्याचे दिले आश्वासन.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: संपूर्ण पुणे जिल्हयातील मुस्लिम बांधवांचा इस्तेमा हा धार्मिक कार्यक्रम यावर्षी इंदापूर मध्ये पार पडणार आहे.4 व 5 एप्रिल 2020 असे दोन दिवसीय या कार्यक्रमाचे स्वरूप असून सध्या या कार्यक्रम स्थळाची जय्यत तयारी चालू आहे. या स्थळी युवा नेते व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन या धार्मिक कार्याला आपल्या शुभेच्छा दिल्या शिवाय आवश्यक ती सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा इस्तेमा पार पडणार असून यात. नमाज,कुरान पठन यासंह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुणे जिल्ह्यातील मुस्लिम लाखो समाज या ठीकाणी येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर यात्रेकरुंना या ठिकाणी राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. साधारण शंभर एकर क्षेत्रावर हा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. त्याच अनुषंगाने सर्व धर्म समभाव जपत या स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद,जावेद शेख यांसह इतर मंडळी उपस्थित होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button