Usmanabad

बालशाहीर अविष्कार विकास एडके यास विषेश पारितोषिक

बालशाहीर अविष्कार विकास एडके यास विषेश पारितोषिक

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब तालुक्यातील हसेगाव शि. येथील मानवहित लोकशाही पक्षाचे सह सचीव विकास एडके यांचे चिरंजीव बालशाहीर कु. अविष्कार विकास एडके याने डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय आँनलाईन शाहीरी कार्यक्रमा मध्ये सहभाग घेतला होता.

त्याचा निकाल १आँगस्ट रोजी जाहीर होऊन सदरील बालशाहीर कु.अविष्कार विकास एडके यास विषेश बक्षीस मिळाले आहे. सदरील गीत गायन स्पर्धेत अण्णाभाऊंनी स्वत: लिहीलेलं अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील गीत गायन स्पर्धेत बालशाहीर अविष्कार एडके याने गायिले होते.

या पूर्वीही त्याने आँनलाईन राज्यस्तरीय पोवाडा व शाहीरी स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला होता.सदरील स्पर्धेत विषेश बक्षीस मिळाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button