ब्राह्मणगाव येथे विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रम उत्स्फुर्तपणे साजरा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक – भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चा कार्यक्रम ब्राह्मणगाव येथे ग्रामपालिका कार्यालय व अंगणवाडी केंद्रात उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला .
:- प्रथम सकाळी 9 वाजता ब्राह्मणगाव येथील ग्रामपालिका कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच- श्री.किरण अहिरे,उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष – श्री.बापुराज खरे,जेष्ठ सदस्य श्री.अरुण अहिरे, श्री.रत्नाकर अहिरे,जेष्ठ नेते श्री.यशवंत बापू अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच श्री.किरण अहिरे ,उपसरपंच ,श्री.बापुराज खरे,श्री.यशवंत बापु अहिरे, श्री.रत्नाकर अहिरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मौलिक विचार व्यक्त केलेत.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच- किरण अहिरे, उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष -बापुराज खरे,जेष्ठ नेते यशवंत बापू अहिरे,जेष्ठ ग्रामपालिका सदस्य – अरुण अहिरे,रत्नाकर अहिरे,केदाभाऊ ढेपले,कैलास नवरे,ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार,सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री – शामभाऊ माळी, कैलास मालपाणी, दत्तात्रेय खरे,समाधान शेवाळे,कैलास उर्फ गणू बापू अहिरे, नवनाथ खरे,पोपट अहिरे तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
:- सकाळी 10 वाजता ब्राह्मणगाव येथील अजमिर सौंदाने रोड येथील अंगणवाडी केंद्रात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात प्रारंभी उपसरपंच श्री.बापुराज खरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे, जेष्ठ ग्रामपालिका सदस्य श्री.रत्नाकर अहिरे ,श्री. केदाभाऊ ढेपले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सविस्तर विचार व्यक्त केले.
यानंतर उपसरपंच बापुराज खरे,जेष्ठ सदस्य रत्नाकर अहिरे ,केदाभाऊ ढेपले, अंगणवाडी सेविका श्रीमती भारती बच्छाव, किरण बच्छाव यांच्या हस्ते लाभार्थी बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका श्रीमती भारती बच्छाव व मदतनीस श्रीमती अहिल्या सूर्यवंशी यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे,जेष्ठ ग्रामपालिका सदस्य श्री.रत्नाकर अहिरे,श्री. केदाभाऊ ढेपले,सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास अहिरे,किरण बच्छाव, अंगणवाडी सेविका श्रीमती भारती बच्छाव, मदतनीस श्री.अहिल्या सूर्यवंशी तसेच अनेक मान्यवर व विद्यार्थी, बालक -पालक यावेळी उपस्थित होते.






